वसईत गणेश मिरवणुकीदरम्यान टँकर बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत गणेश मिरवणुकीदरम्यान टँकर बंदी
वसईत गणेश मिरवणुकीदरम्यान टँकर बंदी

वसईत गणेश मिरवणुकीदरम्यान टँकर बंदी

sakal_logo
By

विरार, ता. ३० (बातमीदार) : वसई तालुक्यात मोठ्या संख्येने गणेशाची प्रतिष्ठापना होणार असून पुढे १० दिवस हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणावर निघण्याची शक्यता लक्षात घेता वसई वाहतूक विभागाने मिरवणुकीत टँकर वर बंदी घातली आहे. गणेशोत्सव काळात सकाळी ५ ते दुपारी २ दरम्यान टँकरची वाहतूक करण्यात येणार असून सायंकाळच्या दरम्यान होणाऱ्या मिरवणूक लक्षात घेता ही बंदी करण्यात आल्याचे वाहतूक विभागाने सांगितले.
वसई तालुक्यात आजही काही ठिकाणी पालिका, प्रशासनाचे पाणी न पोहोचल्याने त्यांना टँकरवरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे वसईत मोठ्या प्रमाणावर टँकरची दिवस रात्र वाहतूक सुरू असते. या टँकरमुळे वसईत अनेक अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे या टँकरबाबत योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे गणेशोत्सव सण लक्षात घेता या दरम्यान निघणाऱ्या मिरवणुकांना टँकरमुळे कोणतीही बाधा येऊ नये यासाठी मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिलेल्या आदेशानुसार वसई वाहतूक विभागाने गणेशोत्सव काळात ठराविक वेळेत टँकर्स ला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

दहा दिवसांसाठी बंदी
वसई तालुक्यात आजपासून (बुधवार) टँकरवर ठराविक वेळेसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पुढील १० दिवस असणार असून सकाळी ५ ते दुपारी २ दरम्यान टँकरची वाहतूक करण्याची मुभा राहणार आहे. त्यानंतर म्हणजेच सायंकाळी होणाऱ्या विसर्जन मिरवणुका लक्षात घेता टँकरला वाहतूक विभागाने मज्जाव केला आहे. याबाबत वाहतूक विभागाने वसईतील टँकर्स असोसिएशन, चालक, मालक यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत सूचित केले असून त्यांनी देखील सायंकाळच्या वेळी टँकर रस्त्यावर धावणार नसल्याचे आश्वासन दिले असल्याचे वसई वाहतूक पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी सांगितले.
शेवटच्या दिवशी रात्रभर बंदी
विशेष म्हणजे शेवटच्या दिवशी ९ सप्टेंबर रोजी होणारी विसर्जन मिरवणूक लक्षात घेता या दिवशी रात्री पूर्णतः टँकर बंदी असणार आहे. ठरविलेल्या वेळेनुसार टँकर धावणार असून नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित टँकरवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे टँकर चालकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन इंगोले यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95153 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..