थाटामाटात गणरायाचे आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थाटामाटात गणरायाचे आगमन
थाटामाटात गणरायाचे आगमन

थाटामाटात गणरायाचे आगमन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० ः टाळ-मृदंग, ढोलकी आणि ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाचे नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात आगमन झाले. नवी मुंबई आणि पनवेल महापालिकांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. या वेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्त्यांवरील खड्डे आणि कृत्रिम विसर्जन तलावांसहीत नैसर्गिक तलावांजवळील तयारीचा आढावा घेतला.
राज्यातील कोविडचा प्रादुर्भाव कमी आल्यामुळे दोन वर्षांनंतर पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा होत आहे. सरकारने कोविडचे सर्व निर्बंध हटवल्यामुळे सर्वच गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. अगदी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा जोरदार तयारी केली आहे. नवी मुंबई महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेलापूर ते दिघा अशा आठ विभाग कार्यालय क्षेत्रात १३४ कृत्रिम विसर्जन तलाव बनविण्यात आले आहेत. कृत्रिम व नैसर्गिक विसर्जन तलावांच्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा सज्ज झाले आहेत. पारंपरिक नैसर्गिक २२ विसर्जन तलावांजवळ जागा असेल त्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव उभारून नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात आणून दिले जाणार आहे. प्रत्येक विभाग कार्यालयाने आपापलया क्षेत्रातील पर्यावरणविषयक जागरूक स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
----------------------------------
विसर्जन घाट सज्ज
नवी मुंबई महापालिका हद्दीत बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली या ठिकाणी नैसर्गिक तलावांमध्ये गणेश विसर्जन केले जाते. या सर्व तलावांच्या जलाशयातील पालापाचोळ्याची नियमित सफाई केली जाते, ती गणेशोत्सव कालावधीत अधिक काटेकोरपणे करण्यात आली आहे. श्रींच्या मूर्तींसोबत येणारे हार, फुले असा ओला निर्माल्य तसेच कंठी, मुकुट, कृत्रिम माळा, सजावट साहित्य निर्माल्य कलशात टाकले जाईल, याकडेही लक्ष ठेवण्यात येणार आहे. विसर्जन स्थळांवर गर्दी टाळण्यासाठी पोलिस विभागदेखील सज्ज आहे.
----------------------------
१० लाख गणेशमूर्तींची स्थापना
नवी मुंबई आणि पनवेल परीसरात तब्बल १० लाख गणेश मूर्तींची स्थापना होते. यात दिड दिवसांपासून अगदी दहा दिवसांच्या गणरायांचा समावेश आहे. नवी मुंबईत चार लाखांपेक्षा जास्त दीड दिवसांचे गणपतींची स्थापना होते. पनवेल महापालिकेच्या हद्दीतही ३ लाखांपेक्षा जास्त दीड दिवसांचे गणपती विराजमान होतात. या सर्व गणरायांच्या विसर्जनाची चोख व्यवस्था महापालिकांनी केली आहे.
-------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95161 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..