महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी अटकेत
महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी अटकेत

महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी अटकेत

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २९ (बातमीदार) : राष्ट्रीय महामार्गावरील कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून कंपनीवर दरोडा टाकून फरारी झालेल्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीला ३६ तासांत अटक करण्यात आली. विरारच्या गुन्हे कक्ष शाखा तीनचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे.
टोळीतील सात जणांना बेड्या ठोकल्या असून या अटक आरोपींवर पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या सर्व आरोपीना वसई न्यायालयात हजर केले असता ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. बद्रिआलम मेहमूद अली खान (वय ३६), इरशाद शौकत आली (वय ५४), मोहम्मद रफिक इद्रिस शहा (वय २७), मोहम्मद तोफिक शेख (वय ३७), मजहर इरशाद आली खान (वय २१), नजीर अहमद शोराब अली शेख (वय ४०), हाफिजउल्ला ईदउल्ला खान (वय २९) असे अटक दरोडेखोरांची नावे आहेत. या दरोडेखोरांना मुंबईच्या सॅण्डहर्स्ट रोड, वाशी, गोवंडी, रे रोड, पालघर जिल्ह्यातील बोईसर या परिसरातून सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95167 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..