मुंबई पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन उद्या मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salary of Mumbai Municipal Corporation employees will be received tomorrow
पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन उद्या मिळणार

मुंबई पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन उद्या मिळणार

मुंबई : मुंबई महापालिका कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी मशीनमधील बिघाडामुळे ४१ हजार पालिका कर्मचाऱ्यांचे कापलेले वेतन त्यांच्या खात्यात १ सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहे. वेतनाबाबत म्युनिसिपल मजदूर युनियनने अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांची भेट घेऊन हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर वेतन जमा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रशासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल समन्वय समितीने आभार मानले आहेत.

महापालिकेत कामगारांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक पद्धती आहे; मात्र अनेक ठिकाणी मशीनमधील बिघाडामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनाला फटका बसतो. ऐन सणासुदीच्या दिवसांत वेतन कापून गेल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही बाब कामगारांच्या समन्वय समितीने अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांच्या लक्षात आणून दिली. कापून गेलेले वेतन गणेशोत्सवाआधी बँक खात्यात जमा करावे व बायोमेट्रिकच्या समस्येबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती.

बायोमेट्रिकची हजेरी वेतनाशी जोडली जाऊ नये, प्रशासनाने यामध्ये चर्चा करून मार्ग काढावा; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला होता. गणेशोत्सव लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे, अशी मागणीही युनियनतर्फे करण्यात आली होती. यावर प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिल्याची माहिती युनियनचे  सरचिटणीस अशोक जाधव यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95175 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..