पर्यावरणपूरक फुलांच्या सजावटीस गणेश भक्तांची पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक फुलांच्या सजावटीस गणेश भक्तांची पसंती
पर्यावरणपूरक फुलांच्या सजावटीस गणेश भक्तांची पसंती

पर्यावरणपूरक फुलांच्या सजावटीस गणेश भक्तांची पसंती

sakal_logo
By

कांदिवली, ता. ३० (बातमीदार) : घरगुती गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी कुटुंबीयांची चांगलीच धावपळ सुरू आहे. पर्यावरणपूरक असलेल्या फुलांनी सजावट केलेला मखरांना गणेश भक्तांची प्रचंड मागणी आहे. महावीरनगर मधील चंदन फ्लोरिस्टकडे ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे.
दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपतीसाठी फुलांनी सजविलेल्या मखरांना जास्त मागणी असते. भक्तांच्या मागणीनुसार कर्निसन, ऑर्किड, जरबेरा रोझ, लिलिज अंथेनियंम, जीप्सो, डेजी आणि ओसिसची फुले पाच सहा दिवस चांगली टिकतात. दीड आणि पाच दिवसांचे गणपतीवाले ऑर्किड फुलांच्या मखरांची जास्त प्रमाणात मागणी करतात. तीन ते १२ हजारापर्यंत मखरांची किंमत असते. ग्राहक महागाईतसुद्धा ऑर्डर देतात. काही भक्त दीड दिवसांसाठी फक्त गुलाबांच्या फुलांचे मखर घेतात. दहा दिवसांपासून ९१ भक्तांनी नोंदणी केली आहे .
----------------------------------
गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांना वाढती मागणी
उकडीचे मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीला दाखवला जातो. मात्र, गणेशोत्सवात वेळेअभावी आणि नोकरीमुळे महिलांना घरी मोदक करणे शक्य नसते. तसेच, फार कमी महिलांना घडीचे उत्तम मोदक बनविता येतात. यामुळे सध्या तयार मोदक घेण्याची संकल्पना रूढ झाली. सध्या बाजारात मिठाईच्या दुकानात आगाऊ नोंदणी करून अथवा घरगुती मोदक बनविणाऱ्या महिलांना ऑर्डर दिली जाते. कांदिवली येथील अंबिका स्वीट या मिठाई विक्रेत्याने उकडीच्या मोदकांची मागणी वाढत असल्याचे सांगितले.
---------------------------------------
महागाईमुळे मोदकांचे दर वाढले
घरगुती उकडीचे उत्तम मोदक बनविणाऱ्या महिला दीपाली कदम आणि सुचेता सबनीस या हॉटेलला चपात्या व भाकरी पुरविण्याचे काम करतात. मात्र, गणेशोत्सवात फक्त उकडीच्या मोदकांची ऑर्डर घेतात. विशेष म्हणजे भक्त सोहळ्यात ऑर्डर ही ११, २१, ५१ आणि १०१ याप्रमाणे देतात. यामुळे ऑर्डरचे मोदक बनविताना चांगलीच दमछाक होते. तांदळाचे पीठ, गूळ, नारळ आणि तूप असे साहित्य लागते. मागील वर्षी १५ ते २० रुपये एक नग प्रमाणे मोदक दिले. मात्र यावर्षी पेट्रोल दरवाढ, नारळाच्या वाढत्या किंमती आणि महागाईमुळे मोदकांचे दर वाढले आहेत. एक नग २० ते २५ रुपयांप्रमाणे देतो. मिठाईवाले, हॉटेल्स व्यावसायिकांनी दिलेली ऑर्डर वेळेतच द्यावी लागते. या वर्षी महागाई वाढली असली तरी मला जास्त ऑर्डर असल्याने सोबतीला तीन महिला घेतल्या आहेत त्यांना नगा मागे ५ रुपये देते. त्या तीन चार तासांत ४०० ते ५०० रुपये कमवितात, असे दीपाली कदम यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95180 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..