मुंबईतील सखल भागांमध्ये ‘फ्लड मीटर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील सखल भागांमध्ये ‘फ्लड मीटर’
मुंबईतील सखल भागांमध्ये ‘फ्लड मीटर’

मुंबईतील सखल भागांमध्ये ‘फ्लड मीटर’

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : मुंबई शहरात पावसाचे साचणारे पाणी तसेच पर्जन्यमानाची माहिती ठेवणारे ‘फ्लड मीटर’ हे उपकरण विविध १०० ठिकाणी बसवण्यात येणार आहे. मुंबई शहराअंतर्गत १०० ठिकाणी हे उपकरण बसवण्यास महापालिकेकडून श्री गणेशा करण्यात आला. 
मुंबईतील सखल भागात नेमके किती पाणी साचते, याबाबतची रिअल टाईम माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेने हे यंत्र वापरण्यासाठी सुरुवात केली आहे. सध्या मुंबईतील २५ ठिकाणी हे फ्लड मीटर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे येत्या महिन्याभराच्या कालावधीत मुंबईतील उर्वरित ७५ ठिकाणी हे मीटर लावण्यात येतील. त्यामध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरांचा समावेश आहे. महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाला पाणी साचणाऱ्या ठिकाणाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हे फ्लड मीटर उपयुक्त ठरतील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
---
उपकरण कसे काम करणार ?  
मुंबईतील पाणी साचण्याची समस्या ओळखून अंकुर पुराणिक या तरूणाने हे उपकरण विकसित केले आहे. विशेष म्हणजे सलग ५० दिवस हे उपकरण सुरू राहील, इतकी त्यातील बॅटरीची क्षमता आहे. साचणारे पाणी आणि त्या काळात झालेला पाऊस अशी दुहेरी आकडेवारी उपलब्ध होतानाच इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाद्वारे ही माहिती पालिकेच्या विभागाला रिअल टाईम अशा प्रत्येक १५ मिनिटांच्या अंतराने उपलब्ध करून देईल. पावसाचे पाणी साचू लागल्यानंतरच हे उपकरण कार्यरत होईल; मात्र इतरवेळी ते बंद असणार आहे. त्यामुळे ते अधिक कालावधीसाठी वापरता येणार आहे.
---
स्वामित्त्व हक्कासाठी प्रयत्न 
फ्लड मीटर उपकरणाच्या स्वामित्त्व हक्कासाठी अंकुर पुराणिकने अर्ज दाखल केला आहे. मुंबईत महापालिकेला किती पाणी साचले आहे, याचा नेमका अंदाज आकडेवारीच्या आधारे मिळावा, हा उद्देश डोक्यात ठेवूनच उपकरण विकसित केल्याचा दावा अंकुरने केला आहे. त्यामुळे पालिकेच्या रस्ते वाहतुकीच्या नियोजनाच्या अनुषंगाने हे उपकरण उपयुक्त ठरू शकेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95185 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..