अपघातांमध्ये मृत्यूची मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातांमध्ये मृत्यूची मालिका
अपघातांमध्ये मृत्यूची मालिका

अपघातांमध्ये मृत्यूची मालिका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः गेल्या वर्षभरात एप्रिल, मे महिना सोडला, तर संपूर्ण दहा महिने वाहन अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. जानेवारी ते मार्च महिन्यात दोन हजारांपेक्षा जास्त अपघात झाले असून, त्यानंतर जून ते डिसेंबर महिन्यातसुद्धा दोन हजारांपेक्षा जास्त अपघात झाले आहे. महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात तब्बल २९,४७७ अपघातांची नोंद झाली असून, अद्यापही वाहन अपघात आणि मृत्यूमध्ये घट होताना दिसून येत नाही.
राष्ट्रीय, राज्य आणि ग्रामीण मार्गांवरील ब्लॅकस्पॉटमुळे वाहन अपघातांची संख्या वाढली असून त्याहीपेक्षा वाहतुकीच्या नियमांचा भंग होत असल्यानेही सर्वाधीक अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये लेन कटिंग, सिग्नल तोडणे, सिट बेल्टचा वापर न करने, मद्य पिऊन वाहन चालवणे, वाहन चालवताना डुलकी येणे, वेगाने वाहन चालवत असल्याने अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे महामार्ग पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.
गेल्या वर्षभरात १२,५५४ जीवघेणे अपघात झाले आहेत;. तर किरकोळ दुखापतीच्या अपघातांची संख्या १०,८६७ असून, ४,००९ गंभीर अपघात, तर इतर २,०४७ अपघातांची संख्या आहे. एकूण २९,४७७ अपघात झाले आहेत. यामध्ये १३,५२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १६,०७३ नागरिक किरकोळ जखमी झाले असून, ६,९९८ नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. असे एकूण ३६,५९९ नागरिक अपघातांचे बळी ठरले आहेत.

गेल्या वर्षभरातील मासिक अपघातांची संख्या
महिना - एकूण अपघात - मृत्यू - अपघातातील एकूण बळी
जानेवारी २९६१ - १३४७ ३८२५
फेब्रुवारी २७८७ १३०३ ३४४९
मार्च २८६४ १३०२ ३४३४
एप्रिल - १७३२ - ८७५ - २१३७
मे - १८४९ - ९४८ - २२३६
जून - २२२७ - १०६२ - २७८६
जुलै - २३२८ - १०८९ - २८६४
आॅगस्ट - २२२५ - ९६४ - २७९६
सप्टेंबर - २२६० - ९८७ - २७२२
आॅक्टोबर - २५७९ - १०७३ - ३१३०
नोव्हेंबर - २७२३ - १२२० - ३५२५
डिसेंबर - २९४२ - १३५८ - ३६९५
एकूण - २९४७७ - १३५२८ - ३६५९९

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95186 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..