मालाडमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करून १७ महिलांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालाडमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त 
करून १७ महिलांची सुटका
मालाडमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करून १७ महिलांची सुटका

मालाडमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करून १७ महिलांची सुटका

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने मालाडमधून एका सेक्स व्हिडीओ कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या सेंटरमधून विद्यार्थ्यांसह १७ महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कॉल सेंटर एखाद्या सेक्स कॉल सेंटरसारखे काम करत होते. तिथे महिलांकडून फोनकॉल किंवा व्हिडीओ कॉलद्वारे अश्लील कृत्य केले जात होते. यासाठी एका अ‍ॅप्लिकेशनद्वारे ग्राहकांना सदर कॉल सेंटरमधील महिलांशी संपर्क साधता येत होता. ग्राहकाच्या मागणीनुसार व्हिडीओ कॉलवर अश्लील वर्तन केले जात होते. यातील काही तरुणी विद्यार्थिनी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या गरिबीचा फायदा घेत त्यांच्याकडून हे गलिच्छ काम करून घेत असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत १७ महिलांची सुटका केली. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95189 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..