सिडकोच्या ४ हजार १५८ घरे विक्रीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडकोच्या ४ हजार १५८ घरे विक्रीला
सिडकोच्या ४ हजार १५८ घरे विक्रीला

सिडकोच्या ४ हजार १५८ घरे विक्रीला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी ‘सर्वांसाठी घरे’ मिशनअंतर्गत समान संधी निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांची लॉटरी सिडकोने जाहीर केली आहे. नवी मुंबईतील विविध नोड्समधील तब्बल ४ हजार १५८ घरे विक्रीस काढली आहेत.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सिडको महामंडळातर्फे, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध घरांसोबतच २४५ वाणिज्यिक गाळे, रेल्वे स्थानक संकुलांतील ६ कार्यालये व त्याचप्रमाणे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीच्या योजना सादर करण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील विविध घटकांचा गणेशोत्सवाचा आनंद निश्चितच द्विगुणित होणार आहे. डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या नेतृत्वाखाली, सिडको सातत्याने घरे, भूखंड, दुकाने आणि कार्यालयांची (कमर्शियल प्रीमाईसेस) विविध योजनांद्वारे समाजातील सर्व घटकांना विक्री करते. ज्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात मदत होण्यासोबतच नवी मुंबईच्या वाणिज्यिक क्षमता वृद्धिंगत होऊन शहराच्या आर्थिक विकासासही हातभार लागतो. नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना या योजनांची घोषणा करून डॉ. संजय मुखर्जी यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर असलेल्या नवी मुंबईत नागरिक, व्यापारी आणि विकसक यांना त्यांची घरे, कार्यालये, व्यावसायिक गाळ्यांची मालकी मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
...
३,७५४ घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता
महागृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील ४,१५८ घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परवडणाऱ्या दरातील या ४,१५८ घरांपैकी ४०४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित ३,७५४ घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत.
...
विविध सुविधा उपलब्ध
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा रुपये ६,००,०००; तर अनुदानाची रक्कम रुपये २,५०,००० निश्चित करण्यात आली आहे. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी ही घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत. या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. आधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इत्यादी सुविधाही उपलब्ध आहेत.
...
२४५ वाणिज्यिक गाळे
सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण २४५ वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण ६ कार्यालये (कमर्शिअल प्रीमाईसेस) विक्रीकरिता उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तारांकित हॉटेलांसाठी एक, निवासी वापरासाठी ६४ तर निवासी तथा वाणिज्यिक वापरासाठी ५ भूखंड विक्रीकरिता उपलब्ध आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95195 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..