टेम्पोच्या धडकेने तरुणी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेम्पोच्या धडकेने तरुणी ठार
टेम्पोच्या धडकेने तरुणी ठार

टेम्पोच्या धडकेने तरुणी ठार

sakal_logo
By

मनोर, ता. ३० (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वरई गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर दुचाकीला भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उड्डाणपुलाच्या गुजरात मार्गिकेवर हा अपघात झाला. प्रिया रवींद्र पवार (वय २३) असे मृत तरुणीचे नाव असून महामार्गालगतच्या हालोली गावच्या सातवी पाड्याची रहिवासी होती.
टेम्पो चालकाने मागून ठोकर मारल्याने अनियंत्रित होऊन दुचाकी टेम्पोसह फरफटत गेल्याने अपघात झाला होता. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रियाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळा वरून टेम्पोसह पळून टेम्पो चालक पळून गेला होता. पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95199 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..