७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

sakal_logo
By

चार दिवसांत दीड लाखांहून अधिक ज्येष्ठांचा एसटी प्रवास
७५ वर्षांवरील नागरिकांसाठीच्या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, ता. १ : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याच्या घोषणेनंतर राज्यभर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. २६ ते २९ ऑगस्ट अशा चार दिवसांत राज्यभरातून सुमारे १ लाख ५१ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास; तर ६५ ते ७५ वर्षांदरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट रोजी मुख्यमत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर २६ ऑगस्टपासून ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासाला सुरुवात झाली. एसटी महामंडळाने योजनेला अमृत ज्येष्ठ नागरिक असे नाव दिले आहे. त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.
२६ ते २९ ऑगस्टदरम्यान चार दिवसांच्या कालावधीत राज्यभरात १ लाख ५१ हजार ५५२ ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला. प्रवासादरम्यान आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र, केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र आदींपैकी कुठलेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येते, असे चन्ने म्हणाले.

१४ लाख ६९ हजार ज्येष्ठ नागरिक
राज्य परिवहन महामंडळाकडे ३४ लाख ८८ हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केली आहे. त्यांपैकी ७५ वर्षांवरील ज्येष्ठांची संख्या १४ लाख ६९ हजार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95205 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..