विसाव्या साहित्य जल्लोषासाठी विद्यार्थ्यांचे कविसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसाव्या साहित्य जल्लोषासाठी विद्यार्थ्यांचे कविसंमेलन
विसाव्या साहित्य जल्लोषासाठी विद्यार्थ्यांचे कविसंमेलन

विसाव्या साहित्य जल्लोषासाठी विद्यार्थ्यांचे कविसंमेलन

sakal_logo
By

विरार, ता. १ (बातमीदार) : साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, वसई-विरार शहर महापालिका व विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी १७ सप्टेंबरला ‘विसावा साहित्य जल्लोष’ वर्तक महाविद्यालय, नवघर येथे होणार आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांचे कविसंमेलन रंगणार आहे. या कार्यक्रमातील कविसंमेलनात यंदा नवोदित, विद्यार्थी कवींचा सहभाग होण्यासाठी त्यांना साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने स्वतंत्र व्यासपीठ संमेलनात उपलब्ध करून दिले आहे. या करिता पालघर जिल्ह्यातील बोर्डी, डहाणू, चिंचणी, बोईसर, पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, सफाळे तसेच वसई तालुक्यांतील सर्व अशा एकूण ३५ महाविद्यालयांना सहभागाकरिता निमंत्रण पत्रे देण्यात आलेली आहेत. या संमेलनात विद्यार्थी कवी यांचे ‘पूर्व कविसंमेलन’ शुक्रवार १६ ला दुपारी जे. सी. राजाणी सभागृह, वर्तक कॅालेज येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुरेखा कुरकुरे व मकरंद सावे विशेष मेहनत घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95207 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..