अखेर भांडुप परिसरातील खड्डे भरायला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर भांडुप परिसरातील खड्डे भरायला सुरुवात
अखेर भांडुप परिसरातील खड्डे भरायला सुरुवात

अखेर भांडुप परिसरातील खड्डे भरायला सुरुवात

sakal_logo
By

भांडुप, ता. १ (बातमीदार) ः एलबीएस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीसह परिसरातील नागरिकांना धुळीचादेखील त्रास होत होता. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रसारित केली होती. त्‍यानंतर या रस्त्यांवर असणारे खड्डे भरायला प्रशासनाने सुरुवात केली असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
भांडुप परिसरात रस्त्याची चाळण झाली होती. जागोजागी खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत होता. वारंवार पाठपुरावा करूनदेखील महापालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग संघटक एस विभाग संतोष पारठे यांनी रस्त्याची कामे न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर महापालिकेने रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95214 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..