पूर्व उपनगरातील ११ गुन्हेगार हद्दपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्व उपनगरातील ११ गुन्हेगार हद्दपार
पूर्व उपनगरातील ११ गुन्हेगार हद्दपार

पूर्व उपनगरातील ११ गुन्हेगार हद्दपार

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १ (बातमीदार) ः पूर्व उपनगरातील चुनाभट्टी, टिळकनगर, गोवंडी तसेच शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११ गुन्हेगारांना मुंबई पोलिसांनी हद्दपार केले आहे. गोवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३, शिवाजीनगरमधून ६, चुनाभट्टीमधून १ तसेच टिळकनगरमधून एका गुन्हेगाराला हद्दपार करण्यात आले आहे.
गोवंडी पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या कुंदन गलाटे या टोळीच्या म्होरक्यासह विशाल गायकवाड, प्रतीक ओव्हाळ ऊर्फ झंप्या, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहाबुद्दीन इद्रिसी या टोळीच्या म्होरक्यासह अलाउद्दीन ऊर्फ अल्लाव इद्रिसी, जावेद ऊर्फ आफताब ऊर्फ जावेद दाढी खान, अब्दुल शेख तसेच शिक्षा भोगून आलेला गुन्हेगार झाकीर काटा ऊर्फ झाकीर शेख, चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अब्दुल कुरेशी व टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आनंद हरिजन ऊर्फ कट्ट्या याला मुंबई पोलिसांनी हद्दपार केले आहे. त्यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांसह चोरीचे गुन्हे आहेत. संबंधित पोलिस ठाण्यांनी या गुन्हेगारांविरोधात परिमंडळ ६ च्या पोलिस उपायुक्तांकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी अब्दुल कुरेशी, आनंद हरिजन यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६, झाकीर काटा विरोधात कलम ५७ नुसार व उर्वरित गुन्हेगारांविरोधात कलम ५५ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95216 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..