प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

पालघर, ता. १ (बातमीदार) : नंडोरे येथे ग्रामपंचायत सभागृहात कृषी प्रक्रिया जागृती पंधरवड्याअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती सदस्या सीमा पाटील यांनी भूषविले. या वेळी तालुका कृषी अधिकारी पालघर तरुण वैती, मंडळ कृषी अधिकारी अनिल नरगुलवार, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य प्रबंधक आदित्य झा, कृषी पर्यवेक्षक जगदीश पाटील, दीपक खोत, किरण संखे, जान्हवी पारधी, मनोज वाकले व सर्व कृषी सहायक सेवक उपस्थित होते. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत नवीन प्रक्रिया उद्योग योजना करणास इच्छुक असलेले ७१ शेतकरी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात मनोज वाकळे यांनी या योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले; तर आदित्य झा यांनी बँकेकडून मिळणाऱ्या कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया याबाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी तरुण वैती यांनी पीक विमा ब्रँड तयार करा, सुरुवातीला प्रॉडक्टची किंमत कमी ठेवा, तर कृषी सहाय्यक सपना पिचड यांनी मार्केटिंग करताना आपल्याकडील तयार झालेले उत्पादन प्रथम आपल्याजवळील व्यक्तींना द्या, असे मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95218 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..