परुळेकर महाविद्यालयात करियर मार्गदर्शन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परुळेकर महाविद्यालयात करियर मार्गदर्शन शिबिर
परुळेकर महाविद्यालयात करियर मार्गदर्शन शिबिर

परुळेकर महाविद्यालयात करियर मार्गदर्शन शिबिर

sakal_logo
By

कासा, ता. १ (बातमीदार) : तलासरीतील आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्ष’ व ‘करिअर कट्टा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी करिअर कट्टा अंतर्गत चालवण्यात येणारे विविध कोर्सेस, तसेच स्पर्धा परीक्षांबाबत माहिती दिली. त्यानंतर कोहिनूर बिझनेस स्कूलचे विष्णू चौरे यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक सल्ला व मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रोज आपला काही वेळ इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी, तर काही वेळ स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व तयारी करून घेण्यासाठी वापरावा, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील १८० विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95220 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..