दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका
दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका

दुचाकी वाहनांसाठी नवी मालिका

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १ (वार्ताहर) ः दुचाकी वाहनासाठी एमएच ४६ सीजी ही नवीन मालिका पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच सुरू होणार आहे. या सुविधेचा उरण, पनवेल, कर्जत, खालापूर येथील वाहनधारकांना लाभ घेता येणार असल्याने इच्छुकांना संपर्क करण्याचे आवाहन पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरून नावे आकर्षित करू शकता. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक जर इतर वाहनांना हवा असल्यास निर्धारित रकमेच्या तिप्पट पैसे भरून तो नंबर ग्राहक आपल्या नवे आरक्षित करू शकतो, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे. तसेच या मालिकेतील आकर्षक एक या क्रमांकांसाठी इच्छुकांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत. पसंतीचा क्रमांक रक्षण करण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम ५७ ‘अ’ अन्वये आकर्षक, अनाकर्षक नोंदणी क्रमांक करायचे असतील, त्यांनी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ लिपिक राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95228 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..