खेळाच्या मैदानात बेवारस वाहने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळाच्या मैदानात बेवारस वाहने
खेळाच्या मैदानात बेवारस वाहने

खेळाच्या मैदानात बेवारस वाहने

sakal_logo
By

घणसोली, ता. १ (बातमीदार) ः घणसोली, सेक्टर ९ येथील एएसपी शाळेच्या समोर काही दिवसांपासून बेवारस वाहने उभी करण्यात आली आहेत. या वाहनांमुळे मैदानात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसोबत खेळाडूंना अडथळे निर्माण होत असल्याने या वाहनांवर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस ठिकठिकाणी बेवारस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. या वाहनांमुळे परिसराची शोभा जात असून जागेचीदेखील अडवणूक होत आहे. घणसोली सेक्टर ९ येथील एएसपी शाळेच्या समोर असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या मैदानावर गेल्या अनेक दिवसांपासून काही बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे परिसरातील मुलांना खेळण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या वाहनांचा मद्यपी आधार घेत असल्याने महापालिकेने त्वरित ही वाहने हटवावीत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95234 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..