अतुल राणे यांचा वामन म्हात्रे यांच्यावर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतुल राणे यांचा वामन म्हात्रे यांच्यावर हल्लाबोल
अतुल राणे यांचा वामन म्हात्रे यांच्यावर हल्लाबोल

अतुल राणे यांचा वामन म्हात्रे यांच्यावर हल्लाबोल

sakal_logo
By

बदलापूर, ता. १ (बातमीदार) : कोकणातून बदलापुरात येऊन व्यवसाय करणाऱ्यांनी मला राजकारण शिकवू नये, अन्यथा मी त्यांचा व्यवसाय बंद करेन, असे निष्ठावंत शिवसैनिक गटाचे वामन म्हात्रे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख अतुल राणे यांना चिमटा काढला होता. यावेळी कोकणातील व मराठा समाजाचा उच्चार केल्याने दुखावलेल्या समाजाच्या वतीने अतुल राणे यांनी पत्रकार परिषद घेत, तुम्ही यापुढे सुधारला नाहीत तर आम्ही तुमचे सगळे घोटाळे उघडकीस आणू, असा थेट इशारा त्यांनी वामन म्हात्रे यांना दिला आहे.

वामन म्हात्रे यांच्या वक्तव्याने बदलापुरातील सामान्य कोकणकर व मराठा समाजातील नागरिक नाराज आहेत. मुळात वामन म्हात्रे यांनी हे विसरू नये की बदलापूर हे देखील कोकण प्रांतात येते आणि तुम्ही स्वतः मूळ बदलापूरकर नाहीत तर उल्हासनगर येथून आलेले निर्वासित आहात, हे तुम्ही विसरू नये, असा चिमटा अतुल राणे यांनी वामन म्हात्रे यांना काढला. तुम्ही सुधारला नाहीत तर तुमचे, टीडीआर, कचरा, टेंडर असे सगळे घोटाळे आम्ही उघडकीस आणून तुम्हाला योग्य ते उत्तर देऊ, असा घणाघाती वार अतुल राणे यांनी वामन म्हात्रे यांच्यावर केला आहे. ज्या मराठ्यांना तुम्ही डिवचत आहात तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सातारा येथील मूळ रहिवासी व मराठाच आहेत. त्यामुळे राजकीय व सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना शब्द जपून वापरण्याचा सल्लादेखील अतुल राणे यांनी वामन म्हात्रे यांना दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95268 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..