सणासुदीला फुलांचा बाजारात तोरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणासुदीला फुलांचा बाजारात तोरा
सणासुदीला फुलांचा बाजारात तोरा

सणासुदीला फुलांचा बाजारात तोरा

sakal_logo
By

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : यंदा गणेशोत्सवात फुलांची दरवाढ अधिकच जाणवत आहे. भाज्यांसोबतच फुलांचेही भाव गगनाला भिडले असून अस्टर, मोगरा, जास्वंद ते अगदी केळीची पानेही महाग झाली असल्याने सणासुदीतच गणेश भक्तांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
सणासुदीच्या काळात फुलांच्या किमती वाढण्याची शक्यता असते. अशातच यंदा निर्बंधमुक्त सण साजरा होणार असल्याने गणेश आगमनासोबत विसर्जन सोहळ्यासाठी बाजार सजला आहे. अस्टरची किंमत ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. गुलाबाच्या पाकळ्या, मिश्र फुलांचा गेल्या आठवड्यांपर्यंत दहा रुपयांना मिळणारा वाटा २५ ते ३० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. गेल्या आठवड्यात पाच ते सात रुपयाला उपलब्ध असणारे गुलाबाचे फूलही २५ रुपयांच्या पार गेले आहे. गुलाबी, पिवळ्या, लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाच्या गुलाबासाठी अगदी ४० ते ४५ रुपये किंमत घेतली जात आहे. या रंगाची फुले कमी असल्याने त्याच्या किमती अधिक असल्याचे विक्रेते सांगतात. शिवाय मोगऱ्याची किंमत ५०० ते ६०० रुपये प्रतिकिलो असून ऑर्किडचे एक फूल ६० रुपये, तर जरबेरा ३० ते ४० रुपयांना उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, स्थानिक मार्केट आणि दादरचा फूलबाजार यांच्या किमतीमध्येही फारशी तफावत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी केवड्याचे पान, मोगऱ्याऐवजी तगर, झेंडू, जास्वंद खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे.

२० ते २५ टक्के भाववाढ
गौरी आगमनाच्या दिवशी या किमती आणखी थोड्या वर चढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे माळा, गजऱ्यांसाठी अनेकांनी फुलांची अतिरिक्त खरेदीही केली. ही फुले फ्रीजमध्ये तीन-चार दिवस टिकत असल्याने भाज्यांच्या साठ्यासोबत फुलांचाही साठा करण्याला अनेकांनी प्राधान्य दिले. सध्या २० ते २५ टक्के भाव वाढलेले आहे

प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :
झेंडू : ३०-९०, गुलछडी : ८०-२५०, अ‍ष्टर : जुडी २०-४०, सुट्टा १००-१५०, कापरी : ३०-९०, शेवंती : ६०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-७०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, जरबेरा : ३०-७०, कार्नेशियन : ६०-८०, शेवंती काडी ८०-१२०, लिली (१० काड्या) ८००-१२००, ऑर्चिड ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१५०, मोगरा ३००-५००.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95274 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..