सणासुदीला लिंबाने खाल्ला भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणासुदीला लिंबाने खाल्ला भाव
सणासुदीला लिंबाने खाल्ला भाव

सणासुदीला लिंबाने खाल्ला भाव

sakal_logo
By

वाशी, ता. १ (बातमीदार) ः बाजारात वर्षभर उपलब्ध होणाऱ्या पिकांमध्ये लिंबाचा अव्वल क्रमांक लागतो. त्यात ‘क’ जीवनसत्त्वामुळे लिंबाची मागणी कायम असते. अशातच ऐन सणासुदीत बाजारात मागणी असताना आवक घटल्याने लिंबू पुन्हा भाव खाणार असल्याचे चित्र आहे.
जून ते ऑगस्टपर्यंतचा पावसाळी लिंबांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे मालाची आवक घटल्याने लिबाचे दर पुन्हा कडाडू लागले आहेत. सध्या नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्नाटक राज्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात लिंबू विक्रीसाठी दाखल होत आहेत. अशातच पोषक वातावरणामुळे पावसाळ्यात लिंबाच्या उत्पादनात वाढ होत असल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात त्याची आवकदेखील होते. मात्र आता हा हंगाम संपत आल्याने विविध ठिकाणाहून होणारी लिंबाची आवक अवघ्या ५ ते ७ वाहनांवर आली आहे. त्यामुळे १४४ क्विंटल वजनी मालाला प्रतवारीनुसार बाजारात कमीत कमी २,००० रुपयांपासून ते सर्वाधिक ४,००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात लिंबाच्या एका नगाला ४; तर किरकोळ बाजारात पाच रुपये; तर मोठ्या लिंबाला १० रुपये मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.

उन्हाळ्यात लिंबांना सर्वाधिक मागणी
उन्हाळी हंगामात बाजारात प्रतिदिन साधारणतः १० ते १५ ट्रक अथवा टेम्पोची आवक होत असते. त्यामुळे पूर्वी फळ बाजारातून लिंबांची मोठ्या प्रमाणात थेट मध्य प्रदेशात निर्यात केली जात होती. यावर्षी उन्हाळ्यात लिंबांना सर्वाधिक भावाचा उच्चांक नोंदवला आहे.

बॉक्स
लिंबांचे पावसाळी हंगामी उत्पादन ऑगस्टपर्यंतच असते. त्यानंतर थेट नोव्हेंबरपासून पुन्हा नव्या हंगामाची सुरुवात होते, तोपर्यंत ग्राहकांना लिंबासाठी खिशाला कात्री लागणार आहे.
- सुरेशकुमार मिश्रा, लिंबूविक्रेता

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95289 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..