जुईनगरमधील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुईनगरमधील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
जुईनगरमधील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

जुईनगरमधील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

sakal_logo
By

जुईनगर, ता. १ (बातमीदार)ः विभागामधील कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कचराकुंड्या हटविण्यात आलेल्या जागेवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने रस्त्याला बकाल रूप आले आहे.
कचराकुंडीमुक्त शहर करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई महापालिकेकडून कचराकुंड्या हटविण्यात येत आहेत. तसेच याच अनुषंगाने जागोजागी फलकांसोबत दररोज सकाळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांचे प्रबोधनही केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात कृती होत नसल्याने त्याचा फटका बसत आहे. जुईनगर विभागामध्ये अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावरच टाकत असल्याने परिसराला बकाल स्वरूप आले आहे. तसेच या कचऱ्याला येणाऱ्या
दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत आहे. जुईनगर विभागामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95293 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..