खवले, वाघनखे विकणारे दोघे जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खवले, वाघनखे विकणारे दोघे जेरबंद
खवले, वाघनखे विकणारे दोघे जेरबंद

खवले, वाघनखे विकणारे दोघे जेरबंद

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : वाघनखे व खवल्या मांजराचे खवले विक्रीसाठी आलेल्या दोघांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी सापळा लावून अटक केली. अनिल दाजी डांगे (वय ३३) व नरेश नारायण मोरे (वय २४) अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेले १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे ४.६ किलो वजनाचे दुर्मिळ प्रजातीची खवले आणि त्याचप्रमाणे ३० हजार रुपये किमतीची दोन वाघनखे जप्त केली. रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर पाटील यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने घणसोली रेल्वे स्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावर सापळा लावला होता. दोघांविरोधात वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95301 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..