वाहतूक कोंडीची समस्या लवकर सोडवू - बाळासाहेब पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक कोंडीची समस्या लवकर सोडवू - बाळासाहेब पाटील
वाहतूक कोंडीची समस्या लवकर सोडवू - बाळासाहेब पाटील

वाहतूक कोंडीची समस्या लवकर सोडवू - बाळासाहेब पाटील

sakal_logo
By

पालघर, ता. १ (बातमीदार) : पालघर शहरात ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांना भेडसावणाऱ्या बेशिस्त वाहतूक समस्येबाबत संबंधित विभाग, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम, आरटीओ, पत्रकार, रिक्षाचालक यांच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला दिले.
ज्येष्ठ नागरिक केंद्रीय सुरक्षा समिती पालघरच्या वतीने पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या दालनामध्ये बैठक घेतली होती. या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांनी वाहतूक समस्यांविषयी आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिक केंद्रीय सुरक्षा समितीचे पालघरमधील अध्यक्ष भगवान पामाळे व इतर ज्येष्ठ नागरिकासह पोलिस अधीक्षकांची बैठक आयोजित केली होती. पालघर शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच शहरातील फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठांसह इतरांनाही रस्त्यावर चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नव्याने रुजू झालेले पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे याची दखल घेतील, म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची भेट घेऊन वाहतुकीची समस्यांविषयी ज्येष्ठ नागरिकांसह वाहतूक समस्येचा त्रास कसा होतो याची माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95317 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..