मत्सव्यवसायाच्या नावाने १३ गुंतवणूकदारांना गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मत्सव्यवसायाच्या नावाने १३ गुंतवणूकदारांना गंडा
मत्सव्यवसायाच्या नावाने १३ गुंतवणूकदारांना गंडा

मत्सव्यवसायाच्या नावाने १३ गुंतवणूकदारांना गंडा

sakal_logo
By

ठाणे, ता. १ : मत्स्यपालन व्यवसायाकरिता १३ गुंतवणूकदारांकडून ठेवी स्वीकारून त्यावर आकर्षक परताव्याचे प्रलोभन दाखवत त्यांची एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात ठाणे शहर पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ५ सप्टेंबरपर्यंत तिघांना पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात असंख्य गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संख्येत व फसवणूक झालेल्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
अजय कृपाशंकर श्रीबस्तक (३५), सलिम चांद सय्यद (४) आणि मोहमद रजा याकुब खान (३४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. इशाक जुम्मन अन्सारी फरार आहे. चौकडीने बनावट नावाने कंपनीची स्थापना करत मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला. एक लाख रुपये वर्षभरासाठी गुंतवल्यास टप्प्या-टप्प्याने मोठ्या गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवले. मोबाईल, लॅपटॉप, परदेशवारी, बुलेट, मारुती कार, आलिशान गाडी, वन - टू बीएचके सदनिका, बंगला, ५० लाख रोख रक्कम, एक कोटी रॉयल्टी आदींचे प्रलोभन दाखवले. अशा प्रकारे १३ गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एक कोटी सात लाख १५ हजार रुपये ठेवी स्वरूपात स्वीकारून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. चौघांविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४०६, ४०९ आणि ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्याचा अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहर पोलिस दलाचे सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त सुनील लोखंडे व सहायक आयुक्त अरविंद वाढणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95334 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..