तिकीट सवलतीसाठी कंत्राटी कर्मचारी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिकीट सवलतीसाठी कंत्राटी कर्मचारी आक्रमक
तिकीट सवलतीसाठी कंत्राटी कर्मचारी आक्रमक

तिकीट सवलतीसाठी कंत्राटी कर्मचारी आक्रमक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : बेस्टच्या सर्व आगारांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना तिकीट आकारण्याच्या सूचना बेस्ट प्रशासनाने दिल्या आहेत. याच मुद्द्यावरून आज शिवाजीनगर आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. टाटा मोटर्स कंपनीच्या सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. परिणामी शिवाजीनगर आगारातून १०० हून अधिक बस बाहेर न पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.

बेस्ट कर्मचाऱ्यांप्रमाणेच लिजच्या बस चालवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही बेस्टच्या प्रवासात सवलत देण्यात येत होती; मात्र ही सवलत रद्द केल्यामुळेच कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासूनच शिवाजीनगर आगारातून बस बाहेर काढण्यास नकार दिला. टाटा मोटर्स कंपनीच्या माध्यमातून ४०० हून अधिक बस बॅकबे, वरळी, शिवाजीनगर आणि मालवणी या आगारातून चालवण्यात येतात. त्यापैकी शिवाजी नगरच्या कर्मचाऱ्यांकडून बसचे तिकीट मागितल्याने पहाटे ५.३० वाजल्यापासूनच संपाचा पवित्रा घेण्यात आला; परंतु कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना ‘चलो बस’ पास देण्याचे कबूल केल्याने ११ च्या सुमारास हा संप मागे घेण्यात आला.

कारवाई होणार
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने प्रवाशांचे हाल झाले. याविरोधात बेस्ट उपक्रमाकडून नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. या आधीही वेतन रखडल्याने बेस्टच्या विविध आगारांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचा पवित्रा घेतला होता. लागोपाठ चार वेळा झालेल्या आंदोलनाचा फटका मुंबईकर प्रवाशांना बसला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95379 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..