एसटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड
एसटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

एसटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : कोरोना काळात राज्यभर एसटीची सेवा पूर्णतः बंद होती; मात्र मुंबईत एसटीला अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे सरकारचे आदेश होते. या काळात एसटी महामंडळाने खासगी संस्थांना कंत्राटी चालक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर एसटी संघटनांचा संप सुरू झाल्यानंतर पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती वाढवण्यात आली; मात्र या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश एसटी वाहतूक महाव्यवस्थापकांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना दिल्याने या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने नवीन भरती प्रक्रिया न राबवता वेतनावर खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विभागवार विविध कंत्राटदारांची निविदा प्रक्रिया राबवून त्या-त्या विभागासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. राज्यभरात तब्बल २१७६ कंत्राटी चालकांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते; मात्र, कंत्राट घेऊनही कर्मचाऱ्यांची पूर्तता केली नसल्याने अखेर संबंधित कंत्राट रद्द करून कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भविष्यात एसटी प्रशासनाकडून नव्याने निविदा प्रक्रिया राबवून राज्यभरासाठी एकच कंत्राटदार नेमण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्यामध्ये सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त नवीन कंत्राटी चालकांची भरती केली जाणार असल्याचेही समजते.

विभाग अपेक्षित कंत्राटी कर्मचारी वापरात असलेले कर्मचारी
औरंगाबाद प्रदेश ३७७ ४४
मुंबई ५०६ ७९
नागपूर ३०० ११७
पुणे ४२८ ९५
नाशिक २९० २६
अमरावती २७५ ८२
एकूण २१७६ ४४३


सध्याच्या नियुक्त कंत्राटदारांनी अपेक्षित संख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचा पुरवठा केला नाही. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी या जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ता रद्द करण्यात येणार आहेत.
- शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक, एसटी वाहतूक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95391 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..