शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांचा सत्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांचा सत्‍कार
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांचा सत्‍कार

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांचा सत्‍कार

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : आपले पालक कोविडमध्ये गमावूनसुद्धा चांगल्या गुणांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या १५ एसएससी विद्यार्थ्यांचा एकता मंच आणि सबर्बन डीस्ट्रीक्ट लीगल अथॉरिटीने शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला सत्कार करण्याचे जाहीर केले आहे. या विद्यार्थ्यांबरोबरच १० टीवायबीकॉम विद्यार्थी, तसेच ज्या सेवाभावी संस्थांनी या कोविडच्या काळात सर्वाधिक ग्रासलेल्या लोकांना निःस्वार्थबुद्धीने आणि अथकपणे मदत केली त्यांचा व मुंबई विद्यापीठातील नॅशनल सर्व्हिस स्कीमच्या (एनएसएस)स्वयंसेवकांचा सत्कार केला जाणार आहे.
हा समारंभ रविवारी (४ सप्टेंबर) सायंकाळी ४ वाजता चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर सीडब्ल्यूसी हायस्कूल, यारी रोड, वर्सोवा, मुंबई येथे होणार आहे. एकता मंच आणि सबर्बन डीस्ट्रीक्ट लीगल अथॉरिटीने कोविडमध्ये २०२०-२१ या काळात ज्या ज्या लोकांनी निःस्वार्थपणे सामाजिक काम केले अशा अनेकांचा सत्कार आतापर्यंत केला आहे. त्या ध्येयाला अनुसरूनच हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

एनएसएससारख्या सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सत्कार होतो आहे. महाविद्यालयात जाणारे एनएसएसमधील विद्यार्थी कोविड काळात निःस्वार्थपणे काम करत होते. या विद्यार्थ्यांबरोबरच कोविडमध्ये पालक गमावल्यावरही ज्या विद्यार्थ्यांनी दहावीत उत्तम यश मिळविले त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याशिवाय त्यांना त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण करण्यासाठी अर्थसाह्यसुद्धा केले जाणार आहे.
- अजय कौल, एकता मंच

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95393 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..