मनसे कार्यकर्त्याच्या गुंडगिरीची महिला आयोगाकडून दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे कार्यकर्त्याच्या गुंडगिरीची 
महिला आयोगाकडून दखल
मनसे कार्यकर्त्याच्या गुंडगिरीची महिला आयोगाकडून दखल

मनसे कार्यकर्त्याच्या गुंडगिरीची महिला आयोगाकडून दखल

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : नागपाडा परिसरात मनसे कार्यकर्त्याकडून महिलेला झालेल्या मारहाणीच्या घटनेची थेट राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांना पत्र पाठवले आहे. तसेच केलेल्या कारवाईबाबत पाच दिवसांमध्ये अहवाल द्यावा, असेही पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. आरोपी विनोद अरगिले याने २८ ऑगस्टला खांब लावल्याबाबत महिलेला मारहाण केली होती. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना गुरुवारी (ता. १) अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95409 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..