मुंबई -नाशिक महामार्गावर चाकू धाक दाखवत लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई -नाशिक महामार्गावर चाकू धाक दाखवत लूट
मुंबई -नाशिक महामार्गावर चाकू धाक दाखवत लूट

मुंबई -नाशिक महामार्गावर चाकू धाक दाखवत लूट

sakal_logo
By

भिवंडी, ता.२ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीस्वार जोडप्याने कार थांबवून चालकास चाकू दाखवत लुटल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वाहनचालकांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर पहाटेच्या वेळी पोलिस उपलब्ध होणार नाही, अशी शक्कल लढवून दुचाकीवरील महिला व पुरुषाने मिळून एकट्या वाहनचालक असलेल्या कार चालकास तालुक्यातील ओवळी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गाठले आणि कारसमोर दुचाकी आडवी लावली. आमच्या दुचाकीला कट का मारली, असा जाब विचारीत कारचालकास चाकू दाखवला. त्याचवेळी त्याची साथीदार महिला कारच्या दुसऱ्या बाजूने कारमध्ये बसून कारचालक योगेश सानप याच्या खिशातून दहा हजार रुपये आणि मोबाईल काढून घेतला; तर अशाच पद्धतीने माणकोली गावाच्या उड्डाण पुलावरून जाणाऱ्या कारमधील संजय बेंडगुळे याच्याजवळील १ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोराला. या दोन्ही कारचालकांनी नारपोली पोलिस ठाण्यात दुचाकी स्वाराविरोधात तक्रार केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महामार्गावर दिवसा प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने अनेक वाहने उभी असतात. मात्र रात्रीच्या अंधारात रस्ता मोकळा असल्याने दुचाकीस्वारांनी अनोखी शक्कल लढवत लूट करण्यास सुरू केल्याने वाहनचालकांत संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95418 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..