हरवलेला मुलगा पालकांकडे स्वाधीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरवलेला मुलगा पालकांकडे स्वाधीन
हरवलेला मुलगा पालकांकडे स्वाधीन

हरवलेला मुलगा पालकांकडे स्वाधीन

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : वाकोला येथे एका पाच वर्षांच्या हरवलेल्या मुलाला पालकांकडे स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे. वाकोला येथील गोळीबार रोड परिसरात बिट कॉन्स्टेबल अशफाक काझी दुचाकीवरून गस्त घालताना त्यांना हा मुलगा पदपथावर रडताना दिसला. त्यांनी त्याची चौकशी केली असता तो काहीही सांगू शकला नाही. पोलिसांनी परिसरातील मंदिर आणि मशिदींमध्ये जाऊन लाऊडस्पीकरवर मुलगा सापडल्याची घोषणा करण्याची विनंती करून पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. सुमारे अडीच तासांनी मुलाचे आई-वडील पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर या मुलाला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलाचे पालक मूळचे पंजाबचे असून, ते निर्मलनगरमध्ये नातेवाईकांकडे राहण्यासाठी आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95426 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..