पेणमधील चावडीचा चिंतामणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेणमधील चावडीचा चिंतामणी
पेणमधील चावडीचा चिंतामणी

पेणमधील चावडीचा चिंतामणी

sakal_logo
By

राजेश कांबळे, पेण
जगभरात गणेशमूर्तींचे माहेरघर म्‍हणून पेण प्रसिद्ध आहे. तब्बल ११० वर्षांपूर्वी शहरातील मध्यवस्तीत हनुमान आळीत चावडी होती. तिथे चिंतामणी नावाच्या एका गोसाव्याने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली, त्या वर्षापासून आजतागायत दरवर्षी स्‍थानिक मंडळी भक्‍तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात.
गणेशोत्सवाचा शतकोत्‍सव धूमधडाक्‍यात साजरा करण्यात आला, त्‍या वेळी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जयपूर पॅलेस’ हा नयनरम्य देखावा सादर केला होता. मंडळाकडून गणेशोत्सवाबरोबरच जन्माष्‍टमी उत्‍सवाचे आयोजन केले जाते.
११० वर्षांपासून चिंतामणी म्हणून जी गणेशमूर्ती मंदिरात आहे, तिची प्रत्येक गणेशोत्सवात प्रतिकृती तयार करून भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात येते. शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार आनंद देवधर यांच्याकडून मूर्ती तयार करण्यात येत असून पाच दिवसांच्या गौरी-गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. मंडळाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटपासह कोरोना काळात अन्नधान्याचे वाटप केले आहे. यंदाच्या वर्षी समीर साने यांची मंडळाच्या अध्यक्षपदी पाच वर्षांकरिता सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शहरातील चावडीच्या चिंतामणी मंदिरात दर संकष्टी चतुर्थीला सामूहिकरीत्या आवर्तन करण्याची परंपरा आजही कायम आहे.

पेण शहरातील सर्वात जुने असणारे चावडीवरील चिंतामणी गणेशाचे मंदिरात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. येणाऱ्या काळात मंदिराची नव्याने उभारणी करण्याचा संकल्प ठेवला आहे.
- समीर साने, अध्यक्ष, चिंतामणी गणेशोत्सव व जन्माष्टमी मंडळ, पेण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95453 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..