चिखलातील पायपीट थांबणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखलातील पायपीट थांबणार
चिखलातील पायपीट थांबणार

चिखलातील पायपीट थांबणार

sakal_logo
By

उरण, ता. ३ (वार्ताहर) ः चिरनेर येथील केळ्याचा माळ आदिवासी वाडीवरील विद्यार्थांची ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या ‘शिक्षणासाठी चिखलवाट’ या बातमीची रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या दोन अभियंत्यांनी नुकतीच या रस्त्याची पाहणी केली असून चिरनेर येथून नवीन रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांची परवड थांबणार आहे.
२५० लोकवस्ती असलेल्या चिरनेर ग्रामपंचायत हद्दीमध्ये केळ्याचा माळ ही आदिवासी वाडी आहे. या वाडीवरील विद्यार्थ्यांना चिरनेर गावात जाण्यासाठी डोंगराच्या चिखल-मातीच्या वाटेतून दररोज दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पहाटे लवकर उठून चिरनेर येथील माध्यमिक शाळेत जाण्यासाठी चिखल-मातीचा रस्ता तुडवण्याची वेळ आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी परवड थांबावी, म्हणून आदिवासींकडून वेळोवेळी पक्का रस्ता तयार करण्याची मागणी केली जात होती. अखेर
‘सकाळ’ने बातमीतून या आदिवासींसाठीच्या रस्त्याची झालेली दुर्दशा मांडली होती. या वृत्ताची दखल रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेतली असून नुकतीच चिरनेर येथील शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून नवीन रस्ता तयार करण्याबाबतच्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.
----------------------------------------
आदिवासींसाठीच्या रस्त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी जमिनी अगोदरच दिल्या आहेत. या रस्त्याची आदिवासी वाडीपर्यंत जाऊन पाहणी केली आहे. तसेच रस्त्यासाठी आराखडा बनविण्यासाठी मोजमाप देखील केले आहे.
- आर. एस. देवांग, उपअभियंता, रायगड जिल्हा परिषद
-----------------------------------------
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही आदिवासींना पक्का रस्ता मिळू नये, हे संतापजनक आहे. या रस्त्यासाठी निधीची कमतरता पडू न देता आवश्यकता भासल्यास आमदार निधी खर्च करून रस्त्याचे काम मार्गी लावणार आहे.
- महेश बालदी, आमदार, उरण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95463 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..