एपीएमसीत काद्याचे दर गडगडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एपीएमसीत काद्याचे दर गडगडले
एपीएमसीत काद्याचे दर गडगडले

एपीएमसीत काद्याचे दर गडगडले

sakal_logo
By

वाशी, ता.३ (बातमीदार) ः वाशीतील एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात नवीन कांदा आवक सुरू झाली आहे. कर्नाटक हुबळी येथील दोन ते अडीच टन कांदा आवक झाल्याने बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो ८ ते ९ रुपयांवर आले आहेत.
गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर कांद्याच्या दराने उच्चांक गाठला होता. यंदा कांद्याचे दर स्थिर आहेत. अशातच बाजारात कर्नाटक हुबळी येथील दोन ते अडीच टन कांदा आवक झाली आहे. त्यामुळे नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याचे दर आणखी कमी होणार आहेत. मात्र, हा कांदा ओला असल्यामुळे या कांद्याला मागणी कमी आहे. सध्या बाजारात जुना कांदा हा १४ ते १५ रुपयांवर विक्री होत आहे; तर नवीन आलेला कांदा हा प्रतिकिलो ८ ते ९ रुपये दराने उपलब्ध आहे. पुढील किमान सहा महिने तरी कांद्याचे दर स्थिर राहतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
-------------------------------
सध्या बाजारात कांदा आवक चांगली आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा होत असल्याने दर स्थिर आहेत. आता नवीन कांदा आवकही सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील सहा महिने कांदा दर स्थिर राहील. मात्र, दर कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केली आहे. त्यामुळे जानेवारीनंतर कांद्याचे दर वधारतील.
- मनोहर तोतलानी, व्यापारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95467 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..