निखळ आनंदाची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निखळ आनंदाची परंपरा
निखळ आनंदाची परंपरा

निखळ आनंदाची परंपरा

sakal_logo
By

निखळ आनंदाची परंपरा
गौरीपूजन आणि ओवसा भरण्याबाबत धार्मिक ग्रंथात कुठे उल्लेख नाही किंवा वैज्ञानिक काहीच आधार नाही. पूर्वी सासरी गेलेल्या मुली माहेरी यायच्या. त्यांना सणाचा आनंद लुटता यावा आणि माहेरच्या मंडळींनाही त्यांचे आवडीचे खाद्यपदार्थ खाऊ घालता यावेत, अशी परंपरा रूढ झाली. ती आजही जपली जाते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आनंद देण्याची ही प्रथा आहे, असे म्हटल्यास हरकत नाही. म्हणजे सासू-सुनेला वंश पुढे वाढवण्यासाठी ओवसाचे सूप देते. ही एक श्रद्धा आहे; पण धर्मग्रंथात त्याचा काहीच उल्लेख नाही. केवळ निखळ आनंद हाच त्यामागचा उद्देश असावा. वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरेनुसार सणांचा आनंद लुटण्याची परंपरा आजही जिवंत आहे, अशी माहिती प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी गौरीपूजनानिमित्त दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95483 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..