मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून मदत द्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून मदत द्यावी
मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून मदत द्यावी

मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून मदत द्यावी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : शहरातील अंतर्गत रस्त्यांसह महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात कोपरी पुलावरील खड्ड्याने वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या विनीत भालेराव यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मृताच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे राहुल पिंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मागील दोन महिन्यांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात दुचाकीस्वारांना रस्त्यावर वाहन चालवताना खड्डे चुकवीत तारेवरची कसरत करावी लागते. अशातच ठाण्यातील वागळे इस्टेट येथील जय भवानी नगर, सी. पी. तलाव येथे राहणारे विनीत भालेराव २६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळच्या सुमारास दुचाकीने मुंबईत जात असताना कोपरी पुलावर वाहतूक कोंडीमुळे धीम्या गतीने चालणाऱ्या अवजड वाहनांच्या गर्दीतून मार्गक्रमण करताना ट्रेलरखाली येऊन मृत्यू झाला. भालेराव यांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती पाहता १० लाख रुपये आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी पिंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95494 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..