प्रदूषणाविरोधात राहुलची २६ राज्यांत दुचाकी सफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदूषणाविरोधात राहुलची २६ राज्यांत दुचाकी सफर
प्रदूषणाविरोधात राहुलची २६ राज्यांत दुचाकी सफर

प्रदूषणाविरोधात राहुलची २६ राज्यांत दुचाकी सफर

sakal_logo
By

संदीप पंडित : विरार

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अशात वसईतील गिरीज येथील तरुण राहुल विन्सेन्ट डिसिल्व्हा या तरुणाने प्रदूषणविरहित भारताचा नारा देत देशातील २६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात जनजागृतीसाठी २३,८४७ किलोमीटरचा प्रवास केला. १७ जानेवारीला त्याने आपल्या या मोहिमेची सुरुवात केली होती. १७४ दिवसांचा प्रवास करून ती मोहीम १० ऑगस्टला संपली.
खाणे-पिणे आणि मौजमजा करण्याऐवजी ज्या देशात आपण जन्मलो त्या देशाची संस्कृती, त्याचे सौंदर्य, तेथील विविध परंपरा समजून घेण्यास प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने राहुलने दुचाकीवरून ही भ्रमंती सुरू केली होती. त्याच्या या भ्रमंतीत त्याने अनेक हिंदू मंदिरे, बौद्ध विहार, स्तूप, मशिदी, चर्च यांना भेटी दिल्या.
या दुचाकी सफरीत त्याला अनेक अनुभवही आले. त्याच्या सफरीत मेघालयातील मॅकमिलन या हॉटेल मालकाने त्याची ६ दिवस मोफत राहण्याची सोय केली; तर मणिपूरला पूल तुटल्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग पडल्याने तेथील एका कुटुंबाने त्याच्या राहण्याची सोय केली होती. फोटोग्राफीची आवड असल्याने आणि एका कंपनीत फोटोग्राफर म्हणून काम करत असल्याने राहुलने या संपूर्ण दौऱ्यात आपला फोटोग्राफीचा छंदही पूर्ण केला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रदूषणविरहित भारतासाठी जनजागृतीचे माझे स्वप्न पूर्ण झाले, असे राहुलने ‘सकाळ’ला सांगितले. या सर्व भ्रमंतीत त्याला २ लाख ३० हजार रुपयांचा खर्च आला. त्यातील ५८ हजार रुपये हे पेट्रोलवर खर्च झाल्याचे त्याने सांगितले. या पुढे देखील आपण पुन्हा एकदा भारत भ्रमणावर जाणार असल्याचे त्याने सांगितले.
.....
प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्यासाठी भारत भ्रमण करणाऱ्या राहुलला अनेक ठिकाणी चांगले अनुभव आले. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार येथे त्याचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण भारत भ्रमणात त्याला आपल्या सैनिकांनी चांगले सहकार्य केले. काहींनी त्याच्याबरोबर फोटो काढले, तर काहींनी त्याला रस्त्याबाबत मार्गदर्शनही केले. उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांचा आंध्र प्रदेशमध्ये त्याला सुखद अनुभव आला. आंध्र प्रदेशमध्ये भाषेची अडचण उभी राहिल्यावर तेथील यूपी, बिहारचे लोक मदतीला आल्याचे राहुलने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95509 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..