श्रींच्या उत्सवाला सामाजिकतेची झालर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रींच्या उत्सवाला सामाजिकतेची झालर
श्रींच्या उत्सवाला सामाजिकतेची झालर

श्रींच्या उत्सवाला सामाजिकतेची झालर

sakal_logo
By

प्रसाद जोशी : वसई
गणेशोत्सव म्हटले की, मंडपापासून ते अगदी घरोघरी सजावट कशी सुंदर, निटनेटकी दिसेल यासाठी जीव ओतून मेहनत केली जाते. त्यातच समाजाप्रती अनेक देखावे साकरण्यात येतात. पण पालघर जिल्ह्यात श्रींच्या उत्सवाला सामाजिकतेची झालर असून, हे देखावे समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न व आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाण करून देत आहेत.
बोर्डी येथे १०३ वर्षांची परंपरा जपत पर्यावरणाचा विचार करून पाटील आळी मित्र मंडळाने गणेशोत्सवात पर्यवरणपूरक उत्सवाचा वसा आजतागायत सुरू ठेवला आहे. त्यामुळे याठिकाणी गुजरातहून देखील गणेशभक्त दर्शनासाठी येत आहेत; तर कोरोना काळात ऑनलाईन अभ्यासामुळे प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आला, मात्र शाळा सुरू झाल्या तरी देखील मोबाईल गेम, समाजमाध्यमांवरील चित्रीकरण असो किंवा कार्टून पाहणे अशा दुनियेत मुले रममाण होत आहेत. यामुळे नायगाव कोळीवाडा येथील तुळशीदास कोळी, सचिन कोळी यांनी पारंपरिक खेळांकडे मुलांनी आकर्षित व्हावे यासाठी देखाव्यात लगोरी, विटी-दांडू, भोवरा यास इतर मैदानी खेळांचे चित्र रेखाटले आहे; तर पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती व सार्वजनिक मंडळाने देखावे तयार करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला असल्याने यातून धडे गिरवत समाज आरोग्य सुदृढ राहण्यास नक्कीच मदत होणार आहे.
-----------------
वायुप्रदूषण, सामाजिक स्वास्थ्य का बिघडते, त्याला कारणीभूत कोण, यावर भाष्य करणारा देखावा गणेशोत्सवाच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे. वसई-विरार शहरात कचऱ्याची समस्या असो किंवा सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, धूम्रपान करणारे नागरिक, त्यांनी कसे वागावे, वाहनतळाची समस्या, फेरीवाला अतिक्रमण अशा एक ना अनेक सामाजिक विषयांना वाचा मितेश भोईर यांनी समाजवटीतून फोडली आहे. या देखाव्याकरिता पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
-----------------
प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव
प्लास्टिक मानवी जीवनावर व जनावरांवरदेखील परिणाम करते, भविष्यात यामुळे हवामान बदल होऊन त्याचा आरोग्यावर मोठा आघात होणार आहे. पुढच्या पिढीला त्यामुळे अनेक परिणामांना सामोरे जावे लागू शकते याची जाणीव नागरिकांत रुजू लागली असून यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टिकचा वापर नागरिकांनी टाळला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95513 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..