पास्टरने लैंगिक छळ केल्याचा तीन मुलींचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पास्टरने लैंगिक छळ केल्याचा तीन मुलींचा आरोप
पास्टरने लैंगिक छळ केल्याचा तीन मुलींचा आरोप

पास्टरने लैंगिक छळ केल्याचा तीन मुलींचा आरोप

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : सीवूड्स येथील बेथेल गॉस्पेल या चर्चमध्ये बेकायदा आश्रमशाळा चालवणाऱ्या पास्टरने विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले होते. आता आणखी तीन मुलींचे लैंगिक शोषण या पास्टरने केल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाने पास्टर राजकुमार येसुदासन याच्यावर लैंगिक शोषणप्रकरणी आणखी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे आश्रमशाळेत कुणाचेही लैंगिक शोषण झाले नाही, असे सांगणारी एआरके फाऊंडेशन संस्था मात्र उघडी पडली आहे.

बेथेल गॉस्पेल या चर्चमध्ये बेकायदा सुरू असलेल्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ होत असल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी या चर्चवर कारवाई केली होती. तेथील ४५ विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली होती. आता १३-१४ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि एका १० वर्षीय मुलीने येसुदासनकडून लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर तीन गुन्हे स्वतंत्रपणे दाखल करण्यात आले आहेत. येसुदासन सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

सीवूड्स येथील आश्रमशाळेतून सुटका करण्यात आलेल्या व उल्हासनगर येथील शासकीय बालगृहात असलेल्या ८ मुली व ३ मुलांकडे महिला व बाल कल्याण विभागाकडून विचारपुस करण्यात येत होती. मात्र मुली घाबरल्या असल्याने त्या जास्त बोलत नव्हत्या. मात्र, त्यांना काहीतरी सांगायचे आहे, असे बालकल्याण समितीच्या लक्षात आले होते. त्यामुळे बालकल्याण समितीने प्रेरणा सामाजिक संस्थेला या आश्रमशाळेतील मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रेरणा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सर्व मुला-मुलींकडे चौकशी केल्यानंतर त्यातील ३ मुलींनी त्यांचे येसुदासन याने लैंगिक शोषण केल्याची माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95531 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..