रस्त्यावरचे चेंबर खचून दुर्घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावरचे चेंबर खचून दुर्घटना
रस्त्यावरचे चेंबर खचून दुर्घटना

रस्त्यावरचे चेंबर खचून दुर्घटना

sakal_logo
By

मालाड, ता. ४ (बातमीदार) ः मालवणीतील मुख्य रस्त्यावरील चेंबर खचून दुर्घटना झाली. दुचाकीस्वार चेंबर खचल्याने पडला; मात्र सुदैवाने थोडक्यात बचावला. शहीद अब्दुल हमीद रस्त्यावर मालवणी क्रमांक १ येथे असलेल्या या चेंबरच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा हे चेंबर खचले आहे. याआधी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तसेच ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात याची दुरुस्ती केली होती; मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हे चेंबर पुन्हा खचले होते. त्यानंतर पालिकेने पुन्हा याची दुरुस्ती केली होती; परंतु निकृष्ट दर्जाचे काम असल्याने अवघ्या काही दिवसांत संपूर्ण चेंबर खचले आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्‍यक्‍त करत या निकृष्ट कामाची जबाबदारी कोणाची, पालिकेची की कंत्राटदाराची? तसेच याबाबत पालिका काय आणि कोणावर कारवाई करणार का, तसेच जर अपघात घडून एखाद्याने जीव गमावला तर कोण जबाबदार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95536 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..