२४ फुटांची इकोफ्रेंडली बाप्पाची मूर्ती  तयार करण्याचा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२४ फुटांची इकोफ्रेंडली बाप्पाची मूर्ती  तयार करण्याचा विक्रम
२४ फुटांची इकोफ्रेंडली बाप्पाची मूर्ती  तयार करण्याचा विक्रम

२४ फुटांची इकोफ्रेंडली बाप्पाची मूर्ती  तयार करण्याचा विक्रम

sakal_logo
By

शाडूची २४ फुटी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती 
‘बूमरॅंगचा राजा’चे शॉवर लावून जागीच होणार विसर्जन 

मुंबई, ता. ४ : चांदिवलीतील ‘बूमरॅंगचा  राजा’ गणेशोत्सव मंडळाने साकारलेली शाडूची २४ फूट उंच पर्यावरणपूरक मूर्ती सध्या भाविकांचे आकर्षण ठरली आहे. शाडूच्या मातीपासून तब्बल २४ फूट मूर्ती करण्यासाठी मंडळाने मोठी मेहनत घेतली आहे. मूर्ती उभारलेल्या ठिकाणीच तिचे विसर्जनही करण्यात येणार आहे. त्यासाठी शॉवरची विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांत मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आल्या होत्या; परंतु यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असल्यानेच  २४ फुटी मूर्ती साकारण्यासाठी आमच्या मंडळाने दिवस-रात्र एक केला. पर्यावरणपूरक मूर्तीही २४ फूट उंचीची करता येते, असा संदेश आम्हाला द्यायचा आहे. इतर मंडळांनीही शाडूच्या मातीच्या जास्त उंचीच्या मूर्ती तयार करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गणेशमूर्ती तयार केलेल्या ठिकाणीच आम्ही तिचे विसर्जन करणार आहोत. त्यासाठी शॉवरची विशेष व्यवस्था करणार आहोत. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल आणि मूर्तीची विटंबनाही रोखता येतील. मूर्तीची प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणीच शॉवरची यंत्रणा लावणार आहोत. टबही आम्ही तयार केले आहेत. अशा प्रकारे प्रथमच विसर्जन होत असेल, असे मंडळाचे अध्यक्ष अरुण शर्मा यांनी सांगितले. 

पर्यावरणपूरक मूर्तीचा संदेश
मूर्ती तयार करण्यासाठी आम्हाला २१ दिवस लागले. पीओपीची मूर्ती साकारतात तशी मेहनत आम्ही घेतली. शाडूच्या मातीची मूर्ती तयार करणे आव्हानात्मक नसते. पीओपीच्या तुलनेत अधिक  वजनाची मूर्ती तयार करता येते, हे आम्ही सिद्ध केले. मूर्तीचे रंगलेपनही तोडीस तोड आहे. पीओपीच्या तुलनेत पर्यावरणपूरक मूर्तीच्या पर्यायाचा अवलंब करण्यात आम्ही इतर मंडळांसमोर आदर्श ठेवला आहे, असे मूर्तिकार राजेश बावनेर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95543 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..