दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन
दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन

दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : दसरा मेळाव्याला अजून वेळ आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या वादावर बोलणे टाळले. ते ठाण्यातील टेंभीनाक्यावरील अंबेमातेच्या पाटाचे पूजन करण्यासाठी आले होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांना दसरा मेळाव्याबाबत प्रश्न विचारला. पण, आता गणेश चतुर्थी झाली; मग अनंत चतुर्दशी येईल, मग नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दसरा आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला खूप वेळ आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कळवा येथील कारखान्यात अंबेमातेची मूर्ती घडवली जाते. दिवंगत नेते आनंद दिघे यांची देवी म्हणून टेंभीनाक्यावरील देवीची ही मूर्ती ओळखली जाते. मुख्यमंत्री शिंदे यांनी कारखान्यात जाऊन पाटाचे पूजन केले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे मुंबई दौऱ्यावर असल्याने त्यांनी वर्षा बंगल्यावर भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले, असे ते म्हणाले. पण, दसरा मेळाव्याबाबत काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला. तसेच, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांविषयी बोलायचेही त्यांनी टाळले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95551 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..