एसटी बँकेची भरती वादाच्या भोवऱ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी बँकेची भरती वादाच्या भोवऱ्यात
एसटी बँकेची भरती वादाच्या भोवऱ्यात

एसटी बँकेची भरती वादाच्या भोवऱ्यात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.३ ः एसटी बँकेच्या महाव्यवस्थापक पदांसह विविध जागेंसाठी ७ ऑगस्ट रोजी बँक व्यवस्थापनाने मुलाखतीचे आयोजन केले आहे. मात्र, कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने पद भरती घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच, मुलाखती रद्द करण्याची मागणी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक तथा बँकेचे अध्यक्ष शेखर चन्ने यांच्याकडे केली आहे.

कोऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष गेली अनेक वर्ष एसटी बँकेत संचालक म्हणून होते. आता ते संघटनेचे काम करत आहेत. बँकेत आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा डाव साळवी यांनी आखला असून, अशाच उमेदवारांना मुलाखतीचे पत्र पाठवण्यात आल्याचा आरोप कास्ट्राईब संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवणे यांनी केला आहे. व्यवस्थापकीय संचालक कान्हेरे यांची नियुक्ती सुद्धा नियमबाह्य करण्यात आली आहे. ७ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या मुलाखती सुद्धा नियमबाह्य पद्धतीने घेण्यात येणार असल्याचा आरोप निरभवणे यांनी केला आहे. सिटी बँकेप्रमाणे एसटी बँकेला सुद्धा बुडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी आणि बँकेच्या ठेवीदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या मुलाखती रद्द करण्यात याव्यात अशी मागणी कास्ट्राईब संघटनेने केली आहे.
--------------
कोऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्यध्यक्ष सुनिल साळवी बँकेत कोणत्याही पदावर नसताना बँकेच्या व्यवस्थापनाचा कारभार बघतात. मर्जीतल्या अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी आणि बँकेतील पैशांवर डोळा असल्याने भरती घोटाळा केला जात आहे.
- सुनिल निरभवणे, सरचिटणीस, कास्ट्राईब
-----------
बँकेला आवश्यक असणारा अधिकारी वर्ग असायला पाहिजे त्यादृष्टीने २०१४ मध्ये अधिकाऱ्यांच्या पद भरतीचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे ही भरती आणि मुलाखती घेतल्या जात आहेत.
- सुनिल साळवी, कार्याध्यक्ष, कोऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन
----------------
रिझर्व बँकेच्या निर्दशाप्रमाणे आम्ही ही भरती घेत आहोत. महत्वाची पदे रिक्त असल्याने बँकेच्या कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेची नियमाप्रमाणे जाहिरात देऊन पात्र उमेदवारांना चार पदांच्या मुलाखतीसाठी बोलवण्यात आले आहे. तुर्तास मुलाखती रद्द करण्याची शक्यता कमी आहे.
- दिलीप कान्हेरे, व्यवस्थापकीय संचालक, एसटी बँक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95553 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..