बचत गटाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक
बचत गटाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक

बचत गटाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक

sakal_logo
By

कासा, ता. ४ (बातमीदार) : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचा फायदा महिलांना आपले आर्थिक स्तर उंचावण्यासाठी होत आहे. गंजाड येथील तेजस्विनी महिला उत्पादन गटाला सुद्धा तीन लाखांचे अनुदान देऊन ९० टक्के सबसिडी देण्यात आली. या बचत गटाच्या महिला पत्रावली, द्रोण, कागदी डिश बनवत आहे. या गटाने स्वतः तयार केलेल्या या वस्तू पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात गोविंद बोडके यांना भेट म्हणून दिल्या. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या महिलांचे कौतुक केले. या बचत गटामुळे अनेक महिलांच्या हाताला काम मिळाले आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95555 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..