सकारात्मक निरपेक्ष मदतीसाठी समाजबांधवांकडून ऊर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकारात्मक निरपेक्ष मदतीसाठी समाजबांधवांकडून ऊर्जा
सकारात्मक निरपेक्ष मदतीसाठी समाजबांधवांकडून ऊर्जा

सकारात्मक निरपेक्ष मदतीसाठी समाजबांधवांकडून ऊर्जा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ता. ३ : समाजप्रगतीच्या वाटचालीत साथीदार बनू या... कोणीही शिक्षण-आरोग्यसुविधेपासून वंचित राहणार नाही, याची प्रतिज्ञा करू या... असं समाज मंडळाच्या बैठकीत किंवा वार्षिक कार्यक्रमात बोललं जातं; मात्र अशा काही घटना, वेळ, प्रसंग असतो ज्यात जो प्रतिसाद मिळतो त्याला तोड नसते. अशीच सकारात्मक घटना नाशिक जिल्ह्यात घडली. समाजबांधवांच्या आर्थिक मदतीने परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा मार्ग सुकर झाला आहे.

गरीब दाम्पत्य असलेले राजेंद्र हरी येवले व एका पायाने अधू असलेल्या रेखा येवले यांचा मुलगा संकेत हा उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात गेला. त्याला तिथे दीड वर्षे लागणाऱ्या उपजीविकेसाठी सुमारे तीन लाख रुपये मदतीची गरज होती. अत्यंत प्रतिकूल व हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करीत संकेतला घडविणाऱ्या पालकांपुढे पैसे मुलाला देण्याचा यक्ष प्रश्‍न उभा राहिला. संकेतच्या मदतीसाठी पुणेस्थित प्राध्यापक दीपक येवले यांनी समाजबांधवांना आवाहन करीत सुमारे तीन हजार जणांना वैयक्तिक मेसेज पाठवले. सत्यतेची जाणीव करून दिली अन्‌ प्रतिसादाने समस्त समाजजागृतीचे दर्शन घडले. २१ ऑगस्टला सुरू झालेला समाज दातृत्वाचा प्रवाह ओसंडून वाहू लागला. अवघ्या दोन दिवसांत तीन लाख रुपये संकेतच्या बॅंक खात्यात जमा झाले. तिसऱ्या दिवशी अधिकच्या ५० हजारांची भर पडली. शंभर रुपये ते एक लाख रुपयापर्यंत मदतीसाठी अक्षरश: रीघ लागली. दात्यांच्या उत्स्फूर्त योगदानामुळे संकेतचा मार्ग प्रशस्त होऊन भविष्य उज्ज्वल होण्यास बूस्टर डोस मिळाला. संकेतचा जीवनप्रवास सुरळीत करण्यासाठीच्या प्रवासात प्रा. येवले यांच्या सकारात्मकतेला नाशिक येथील सुरेश धामणे, लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन, भूषण महाजन, पुणे येथील प्रशांत पाटे, सीए अमोल भोकरे, कल्याण येथील प्रकाश बापू वाणी यांनी ऊर्जा दिली. दातृत्ववानांसह समाजरत्न असलेल्या समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने सढळ हाताने जी मदत केली त्याबद्दल संकेतने भावनाविवश होऊन व्यक्त केलेली आंतरिक संवेदना बरेच काही सांगून गेली.

कोट
माझे रक्ताचे नातेवाईक तर हेच ७९ समाज महानुभाव आहेत. त्यांच्या ऋणात कायमच मी राहाणे पसंत करेन. २०२४ मध्ये मी सर्वांच्या पैशांची परतफेड तर करीनच, त्यासोबतच मला मिळालेल्या अधिकच्या पैशांचा विनियोग माझ्यासारख्या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करीन.
- संकेत येवले, ऑस्ट्रेलिया

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95558 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..