रेल्वेपुलावर फेरीवाल्यांचा कब्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेपुलावर फेरीवाल्यांचा कब्जा
रेल्वेपुलावर फेरीवाल्यांचा कब्जा

रेल्वेपुलावर फेरीवाल्यांचा कब्जा

sakal_logo
By

नेरूळ, ता. ४ (बातमीदार)ः नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला पदपथ आणि रस्त्यावर बेकायदा व्यवसाय करून नागरिकांची वाट अडविणाऱ्या फेरीवाल्यांना महापालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. यासाठी महापालिकेने सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यामुळे रस्त्यावर व्यवसाय करता येत नसल्याने फेरीवाल्यांनी रेल्वे स्थानकाबाहेरील पादचारी पुलावर बस्तान मांडल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबई शहरातील पदपथांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बेकायदा व्यवसाय करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता अशा विविध समस्यांना सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडील पदपथ आणि रस्तेदेखील फेरीवाल्यांनी काबीज केले असून या ठिकाणी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून फेरीवाल्यांनी येथे बाजार मांडला असल्यामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे महापालिकेने गेल्या काही आठवड्यापासून फेरीवाल्यांवर नियंत्रणासाठी या परिसरात सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यामुळे परिसरातील पदपथ आणि रस्त्यांवरील फेरीवाल्यांची संख्या कमी झाली आहे; परंतु रेल्वेच्या पादचारी पुलावर या फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
-----------------------------------
नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागातदेखील फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते काबीज केले असून अपघातदेखील घडत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या परिसरातील फेरीवाल्यांवरदेखील कारवाई करण्यात यावी.
- शीतल राऊत, प्रवासी
-----------------------------------------
रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा परिसर आहे. त्यामुळे लोकांना पदपथांवरून चालावे लागते; परंतु फेरीवाल्यांनी येथे बाजार मांडला आहे.
- मानसी तोत्रे, रहिवासी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95573 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..