रिपाई पालघर जिल्हा कार्याध्यक्षपदी रत्नाकर भालेराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपाई पालघर जिल्हा कार्याध्यक्षपदी रत्नाकर भालेराव
रिपाई पालघर जिल्हा कार्याध्यक्षपदी रत्नाकर भालेराव

रिपाई पालघर जिल्हा कार्याध्यक्षपदी रत्नाकर भालेराव

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) : रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबई येथे झालेल्या बैठकीत रिपाइं राज्य व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून फेर निवडणूक घेण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने ठाणे-पालघर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश बारशिंगे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह पालघर येथे झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी सुरेश जाधव, कार्याध्यक्ष रत्नाकर भालेराव, सरचिटणीस सोमनाथ धनगावकर, उपाध्यक्ष नवीन त्रिपाठी, कोषाध्यक्ष राजेंद्र दोंदे, युवा अध्यक्ष राम जाधव यांची निवड करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन पालघर जिल्ह्यात रिपाइंची ताकद वाढवू, असे रत्नाकर भालेराव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95580 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..