विक्रमगडमध्ये विजेचा लपंडाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये विजेचा लपंडाव
विक्रमगडमध्ये विजेचा लपंडाव

विक्रमगडमध्ये विजेचा लपंडाव

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) : विक्रमगड तालुका व परिसरात सततच्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांचे हाल होत आहेत. पूर्वी पालघरहून वीज जोडणी देण्यात आली होती, तेव्हाही विजेची समस्या होती, पण त्याचे प्रमाण कमी होते. पण आता बोईसरवरून वीज जोडणी दिल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. गणेशोत्सव सुरू असताना या परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे आता वीजग्राहक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
विक्रमगड तालुक्यात विजेच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. दिवसभरात सलग एक तास विजेचा पुरवठा झाला असे चित्र फारच क्वचित दिसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सुधारणा केली जात नाही. त्यामुळे ही वीज समस्या सुटणार तरी कधी, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.
विक्रमगड तालुक्याला सध्या विजेच्या प्रश्नाने पुर्ते ग्रासले आहे. चोवीस तासापैकी काही तास वीज उपलब्ध होत आहे. त्यातही सातत्य नसल्याने त्याचा दिवस-रात्र फारसा उपयोग नाही. त्यामुळे महावितरणच्या विजेसंबंधित असलेल्या या गाफील कामाविषयी नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. दिवस-रात्र विजेचे खंडित होणारे प्रमाणामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
....
व्यावसायिकांना फटका
विक्रमगड तालुक्यात मोठ्या संख्येने झेरॉक्स, संगणक व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांना विजेच्या समस्येमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे महावितरणने इतर विक्रमगड तालुक्यातील विजेची समस्या सोडवावी, जर यात काही तांत्रिक अडचणी असतील तर पूर्वीप्रमाणे पालघरहून वीज जोडणी द्यावी, अशी मागणी वीजग्राहक करत आहेत.
...
विक्रमगडमधील फिडरच्या लाईन जंगल भागातून जात असल्याने पावसाळ्यात यावर झाड पडून किंवा इतर तांत्रिक कारणाने वीज जात असते. मात्र महावितरणकडून तात्काळ दुरुस्ती करून तालुक्यातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येतो.
- महेश नागूळ, उप कार्यकारी अभियंता, महावितरण, विक्रमगड

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95582 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..