जव्हारच्या मंडळाचे १२५वे वर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हारच्या मंडळाचे १२५वे वर्ष
जव्हारच्या मंडळाचे १२५वे वर्ष

जव्हारच्या मंडळाचे १२५वे वर्ष

sakal_logo
By

जव्हार, ता. ४ (बातमीदार) : ऐतिहासिक जव्हार शहरातील सार्वजनिक श्रीराम मंदिर श्रीगणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे १२५ वर्ष आहे. यंदाच्या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, लावणी अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन मंडळाच्या कार्यकारिणीने केले आहे.
पालघर जिल्ह्यातील प्रख्यात व ऐतिहासिक असे सार्वजनिक गणेश मंडळ १८९८ साली स्थापन झाले. यंदा या मंडळाचे १२५ वे वर्ष असल्याने या वर्षी उत्सवात भक्तांचा आनंद हा शिगेला पोहचणार आहे. यामुळे विविध प्रकारच्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी जव्हारकर हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत.
यंदा आरोग्य शिबिरासह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, यात विशेषकरून गर्भाशयाच्या कॅन्सरची चाचणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे गत ५० वर्षांत ज्या व्यक्तींनी मंडळाचे अध्यक्षस्थान भूषविले अशांनी त्यांचे अनुभव आणि त्या वेळेची परिस्थिती कशी होती, यावर आपले अनुभव सांगणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95586 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..