चिल्ड्रेन्स होममधून पळालेला अल्पवयीन ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिल्ड्रेन्स होममधून पळालेला अल्पवयीन ताब्यात
चिल्ड्रेन्स होममधून पळालेला अल्पवयीन ताब्यात

चिल्ड्रेन्स होममधून पळालेला अल्पवयीन ताब्यात

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ४ (बातमीदार) ः मानखुर्दच्या चिल्ड्रेन्स होममधून शनिवारी सकाळी पळून गेलेल्या अल्पवयीनाला गोवंडीच्या शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या ३ तासांत शोधून काढले. त्यानंतर चिल्ड्रेन्स होमने कायदेशीर पूर्तता करून त्‍याला मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याच्या कोतवाली पोलिस पथकाच्या ताब्यात दिले.
ऑगस्‍ट महिन्यात शिवाजीनगर पोलिस दुपारी चारच्या सुमारास लोटस गार्डन परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी त्या ठिकाणी एक अल्पवयीन संशयास्पदरीत्या वावरताना आढळला. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर बाल न्यायालयातून पळून आल्याचे त्याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. तो ताब्यात असताना हवालदार प्रवीण शिंदे यांनी त्याला बोलता करत मुंबई व दिल्लीतील नातेवाईकांची माहिती काढून घेतली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी नरसिंगपूरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्या वेळी त्या अल्पवयीनाविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असल्याचे सांगत ताब्यात घेण्यासाठी येईपर्यंत बालगृहात ठेवण्याची विनंती केली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी त्याला डोंगरीच्या बालगृहात दाखल केले. सोमवारी त्याला डोंगरीतून मानखुर्दच्या चिल्ड्रेन्स होममध्ये पाठवण्यात आले होते.

असा होता घटनाक्रम
शनिवारी सकाळी त्याने खिडकीचा गज व जाळी वाकवून पळ काढला. याविषयी माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजाने यांनी सहायक निरीक्षक सचिन कदम यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकासह चार पथके स्थापन केली व शोध घेण्यास सुरुवात केली. या पथकांनी लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या मुख्य रेल्वे स्थानकांवर शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना तो बैंगणवाडी सिग्नलजवळ दिसला. हवालदार शिंदे यांच्याकडे त्याच्या शिवाजीनगर येथील नातेवाईकाविषयी माहिती होती. त्यानुसार सापळा लावून त्याला नऊ वाजता ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा मानखुर्दच्या चिल्ड्रेन्स होमकडे सोपवण्यात आले व होमने त्याला मध्य प्रदेश पोलिसांकडे सोपवले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95587 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..